Wednesday, May 12, 2010

Blue Eyes

निळ्या निळ्या डोळ्याचं हे गोंडस पिल्लू कधी एकदा घरी घेवुन एईन असे मला ज़ाले होते.  नेहा आणि दिव्या ह्या माज्या बरोबर विद्यापिठाच्या होस्टेल मधे रहात होत्या आणि त्यांनी एक-एक मांजरांची पिल्लै पाळ्ली होती. 'बेबो' नेहाच्या मांजरीचे नाव तर 'मानो'  दिव्याचा मांजरीचे नाव होते. 'मानो' नर आहे की मादी हे पहिल्यापासून कोड़ेचं होते. पण खुप जणांनी 'मानो' नर आहे असे सांगितले आणि 'मानो' नर समजुन मोठा ज़ाला. 'मानो' हा दिसायला अगदी वाघाचा बछड़ा होता. हे मांजराचं पिल्लू जसं जसं मोठं होत होतं तस तसं त्याच्या लिंगाचा प्रश्न नेहमीच वाटतं होता. इथे अमेरिकेत मांजरा, कुत्र्यांची संख्या मोजकी रहावी म्हणून त्यांचे ऑपरेशन करून त्यांना नुएत्रल केले जाते.  नुएत्रल म्हणजे त्यांची पिल्लै तयार करण्याची क्षमता नाहीशी केली जाते. दिव्या 'मानो' नर असल्यामुळे निश्चिंत होती. हे 'मानो' मांजर  कधी कधी आमच्या सगळ्यांचा डोळा चुकवून दरवाजाउघडा राहिला की बाहेर पलुन जाऊ लागले. त्याची ही नेहमीचीच सवय जाली होती. मग 'मानो' खुपच हट्टी जाला. त्याला बाहेर नाही सोडले की रडू लागला मग आम्ही त्याला बाहेर सोडू लागलो. दिव्याचा भारताला भेट द्यायचा प्लान ज़ाला आणि ती भारताला एक महिन्यासाठी रवाना जाली. नेहमीप्रमाने आम्ही 'मानो' ला बाहेर सोडायचो आणि 'मानो' भूक लागली की घरी यायचा. नेहा ने ठरवले 'मानो' ला थोड़ी शिक्षा जाली पाहिजे, मग तिने 'मानो' ला एक दिवस घरातच नाही घेतले. 'मानो' बाहेरच उपाशीच राहिला. 'मानो' ही घरी नाही आला. मला थोड़ी काळजीच वाटत होती. मग 'मानो' दोन दिवसानी घरी आला आणि पुन्हा त्याने बाहेर जायचे नाव घेतले नाही. आम्ही एकदम खुश होतो, कशी अद्दल घडली  म्हणून. एक - दोन आठवाद्यानी 'मानो' चे पोट मोठे जाल्यासारखे वाटू लागले. 'मानो' ला पिल्लै होण्याची सर्व काही लक्षणे दिसत होती. आम्हाला दाट शंका वाटू लागली. 'मानो' प्रेग्नंत ज़ाला की काय? ही आमची शंका खरी होणार की काय असे प्रश्न येवू लागले. इन्टरनेट वर मांजरांची प्रेग्नन्सी बद्दल माहिती शोध सुरु ज़ाला. मी आणि नेहा दोघी इन्टरनेट शोध घेत होतो. 'मानो' ची सगळी प्रेग्ननंत असण्याची लक्षणे बरोबर आहेत ह्यावर आमचा विश्वास बसला आणि 'मानो' प्रेग्नंत असण्याचे निश्चित जाले. दिव्या तिच्या भारत ट्रिप वरुण आली आणि आम्ही तिला मोठी आनंदाची बातामीही सांगितली. दिव्याला खुप वाईट वाटले पण काही पर्याय नव्हता तिला वस्तुस्तिथिला सामोरे जावे लागणार होते आणि काही आठवद्द्यातच 'मानो' ची पिल्लै येणार होती. आम्ही 'मानो' च्या नावात बदल करून त्याला स्त्रीलिंग 'मानी' म्हणून बोलावू लागलो. 

मध्यांतरात दिव्या ला होस्टेल मधून बाहेर रहायला जावे लागले. ती 'मानी' ला सुद्धा घेवुन घेली. मी आणि नेहा 'मानी' ची कालजी घे म्हणून वारंवार दिव्या ला सांगत होतो आणि दिव्या हो-हो म्हणून आम्हाला सांगत होती. दिव्या होस्टेल मधून बाहेर राहू लागली काही आठवडे निघून गेले. एक दिवस सकाळी दिव्याचा फ़ोन आला, तो दिवस होता २० एप्रिल २०१०. आनंदाची बातमी होती, 'मानी' ला तिन पिल्लै जाली होती. आम्ही एवढे खुश जालो. पाहिले पिल्लू अशक्त असल्यामुळे जगु नाही शकले पण दूसरी दोन पिल्लै एकदम छान आहेत असे तिने फ़ोन वर सांगितले. आणि आम्ही संध्याकाळी ऑफिस नंतर तिच्या खोली वर जायचा बेत केला. संध्याकाळी आम्ही तिच्या कड़े गेलो, मानी ची पिल्लै कधी एकदा पाहतो असे आम्हाला जाले होते, आम्ही पलतच मानी कड़े धावलो. मानी छान पिल्लांसोबत एका  बॉक्स मधे पडली होती. एक पिल्लू मानी सारखं आणि एकदम वेगळ्या करड्या रंगाचं होतं. दोन्ही पिल्लै एकदम गोंडस आणि एकदम छोटी छोटी होती. आईच्या कुशीत छान दूध पित होती. आम्ही त्यांना पहातच बसलो. 'मानी' एकदम अभिमानी आई सारखी आमच्या कड़े बघत होती आणि सांगत होती मी आज 'आई' जाले म्हणून. आम्ही त्यांचे छान फोटो घेतले. हे सगळ होतं असताना माज्या मनातं काहीतरी येतं होतं. मी ह्यातलं एक पिल्लूं  पाळनयाचा विचार करत होते.  माज्या नवरयाला लगेच फ़ोन केला, त्यांना ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना होतीच, त्यांनी ही 'होकर' दिला, पण पिल्लाची कालजी आणि सर्व काही ठीक होइल ह्याची खात्री जाल्यावरच. मी एकदम खुश होते. मी 'मानी' च्या रंगाचं पिल्लू पालेन असे दिव्या ला सांगुन टाकले आणि पिल्लू जरा मोठे जाले की घेवुन जाईन असे ठरवले. तिनेही पिल्लू कोणाला देणार नाही म्हणून सांगितले. आज तिन आठवदे जाले आणि दिव्याचा फ़ोन आला, ईमेल चेक केले का म्हणून. तिने काहीतरी पाठवले होते. मी पटकन ईमेल उघडले आणि पाहते तर दिव्याने मी घेणार त्या पिल्लाचे फोटो काढून पाठवले होते. मी फोटो पाहून एकदम खुश जाले. पिल्लू मोठे जाले  होते आणि वाघाच्या पिल्लासारखे दिसत होते. त्याचे डोले नीले नीले होते. कान आणि तोंड पांढरे होते. त्याच्या स्किनवरचे केस छान काळ्या-पांढराया रंगाचे होते. त्याचे नीले डोळे तर एवढे लोभस वाटत होते की त्याला कधी घरी आणते असे मला जाले होते. उदया पुन्हा एकदा ह्या मोठ्या ज़ालेल्या पिल्लाला पाहण्यासाठी आम्ही प्लान करत आहोत. ह्या निळ्या गोंडस पिल्लाला घरी आनन्यासाठी मोठी उत्सुकता लागली आहे. लवकरच हे पिल्लू घरी येणार आहे.   

Tuesday, May 11, 2010

Blog Language

ब्लॉग इंग्रजी मधे टाइप करून मराठीमधे त्याचे भाषांतर होत असले तरी मराठी शब्दांसाठी इंग्रजी शब्द लिहिणे मला थोड़े कठीण होत आहे. असे इंग्रजी शब्द मराठीत टाइप करण्याचा मी प्रयत्न करत आहे त्यामुले  तुम्ही माजी मराठी समजुन घ्याल अशी आशा आहे. मला अजुनही ब्लॉगचे नाव, आणि त्यातल्या विषयांची नावे मराठीतून लिहिता नाही आली, पण लवकरच मी ते शोधेन आणि हा ब्लॉग अधिकाधिक मराठीतून लिहायचा काटेकोर प्रयत्न करेन.