खुप दिवस विचार करत होते ब्लॉग लिहिन म्हणून पण नेहमी काही ना काही कारण समोर उभे करून लिहायचे राहुनच जात आहे. याच्या मागचे कारण माज़े आलशीपण असू शकते हे खरे. आज ठरवले जे काही मनात येते ते इथे लिहून काढायचे. माणुस हा एकटा, कोणाशी न बोलता कधी राहू शकत नाही. त्याला जरी बोलायची किंवा गप्पा मारायची आवड नसली तरी तो स्वताहाशी नक्कीच गप्पा मारत असतो. मनातले विचार बोलण्यासाठी जवलपास लोक हवेत किंवा हातात पेन पेपर असला म्हणजे उत्तम.
मला आठवते, जेव्हा कॉलेज मधे होते तेव्हा एक प्रोफेस्सर होते. त्यांचे नाव 'कोलपकर' सर. ते नेहमी क्लास तासामधे कहिनाकाही विनोद सांगुन हसवायाचे. क्लास जाम खुश होता त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीवर आणि नविन नविन विनोदांवर. ते नेहमी म्हणायचे तुम्ही 'डायरी' लिहायची सवय जोपसा. तुम्हाला जे काही वाटते ते लिहा. रोज चार लाइंस तरी लिहा. मग पहा जीवन जगन्यास कसा आनंद येतो ते. मग मला रोज नाही पण जेव्हा आठवन येईल तेव्हा डायरी लिहायची तात्पुरती सवय लागली होती. सुरुवातीला ही डायरी लिहायचा नित्य नियम होता. कधी लेख तर कधी कविता. पण जसा जसा अभ्यास आणि करियर चा विचार वाढला तस तसा डायरी लिहायचा विचारही विरल होऊ लागला. पण हे डायरी न लिहायच्या मागचे कारण होते. आज ब्लॉग च्या निमित्ताने का होइना, काही थोड़े फार लिहायची सवय लावून घ्यायचा मी प्रयत्न करणार आहे आणि माज़ा पहिला ब्लॉग मी इथेच संपवणार आहे. आज मी माजा पहिला ब्लॉग लिहितिये, याचा मला खुप आनंद होतोय.

No comments:
Post a Comment